मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक ते अपर पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
काय निर्णय?
गृह विभागाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना यापूर्वी ५ हजार रुपयांचा गणवेश भत्ता दिला जात होता. गणवेश भत्ता वाढवण्यात यावा, अशी मागणी देखील होत होती. अखेर गृहविभागानं पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यामध्ये १ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं पोलीस अधिकाऱ्यांना आता वार्षिक गणवेश भत्ता सहा हजार रुपये मिळणार आहे.
निर्णय कोणत्या अधिकाऱ्यांसाठी लागू
पोलीस उप निरीक्षक ते अपर पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांना लाभ मिळणार आहे.