---Advertisement---

Gold-silver rate: सोने- चांदीच्या दरात मोठी घट; जळगाव सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, जाणून घ्या काय आहेत दर…

by team
---Advertisement---

जळगाव : सोन्याचा भाव दिवसेगणिक वाढताना दिसत असून गत आठवड्यातही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.  सोन्याचे दर दररोज नवनवीन रेकॉर्ड बनवत असून, बुधवारी जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे दर तब्बल १४०० रुपयांनी वाढले होते.

अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती, मात्र आता त्यात मोठी घसरण पाहायला मिळतेय. शनिवारी (दि. १६ फेब्रुवारी) सोन्याच्या दरात तब्बल ₹1,200 ची घट झाली. सोन्याच्या भावात बाराशे रुपयाने तर चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी घट झाल्याने सोने बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.

प्रमुख शहरांतील २२ व २४ कॅरेट सोन्याचे दर

शहर २२ कॅरेट (₹/ग्राम) २४ कॅरेट (₹/ग्राम)
मुंबई ₹7,890 ₹8,607
पुणे ₹7,890 ₹8,607
जळगाव ₹7,890 ₹8,607
संभाजीनगर ₹7,890 ₹8,607

 

हेही वाचा:  लग्नाचा आनंद गोंधळात बदलला! थाटामाटात वरात निघाली अन् वधूचा पहिला नवरा मंडपात आला आणि सगळं…

चांदीच्या दरात मोठी घसरण
शनिवारी  चांदीच्या दरात  ₹2,100 घसरण झाल्यामुळे चांदी  ₹96,200 प्रति किलो झाली आहे.
यामुळे आगामी लग्नसराईमध्ये ग्राहकांना खरेदीसाठी मोठा फायदा होणार आहे.

पुढील काळात दर वाढतील की घसरण होईल?

विशेषज्ञांच्या मते, जागतिक बाजारातील घडामोडींवर आणि डॉलर-रुपया विनिमय दरावर याचा परिणाम होईल. त्यामुळे पुढील काही दिवसांत दर कमी किंवा स्थिर राहण्याची शक्यता आहे.

(Disclaimer: वरील दर दागिने विक्रेते व स्थानिक बाजारपेठेनुसार थोडेफार बदलू शकतात.)

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment