---Advertisement---

Nandurbar News : सातपुड्यात तापमानात मोठी घट, डाब परिसरात हिमकणांचा साठा

by team
---Advertisement---

नंदुरबार :  अक्कलकुवा शहरापासून सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या डाब या परिसराला आदिवासी भाषेत “हेला दाब” म्हणून ओळखले जाते. या परिसरात कडाक्याची थंडी पडते, ज्यामुळे येथील वातावरणात बर्फाच्या स्वरूपात दवबिंदू गोठतात.

सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसर आणि इतर अति दुर्गम भागांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमान घसरल्यामुळे स्थानिक नागरिकांना तीव्र थंडीची लक्षणे जाणवू लागली आहेत. घराबाहेर पडताच नागरिकांचे हात-पाय सुन्न पडत आहेत. दरम्यान, डाब परिसराला “कुल्लू मनाली” म्हणून ओळखले जाते.

अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात विशेषतः तापमान 4 ते 5 अंशांमध्ये घसरल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. येथे थंडीचे प्रमाण इतके आहे की गाड्यांच्या टपांवर, गवतावर हिमकणांचा साठा झालेला दिसून येत आहे. पाणी गोठून बर्फाच्या स्वरूपात साचले आहे, तसेच माठातील पाणी देखील गोठले आहे. या भागात दरवर्षी हिवाळ्यात तापमान अतिशय कमी होऊन बर्फाचा गोठवणारा अनुभव येतो.

अक्कलकुवा शहरापासून सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या डाब या परिसराला आदिवासी भाषेत कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे हेला दाब म्हणून ओळखले जाते. या  परिस्थितीमुळे, डाब आणि आसपासच्या गावांमध्ये बर्फाची पांढरी चादर पसरली आहे, आणि दवबिंदूही गारठल्याने वातावरण आणखी थंड झाले आहे. यामुळे सातपुड्याच्या या डाब परिसराला “कुल्लू मनाली” म्हणून ओळखले जाते.

हवामान विभागाने सांगितले की, येत्या दोन दिवसांत उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानात आणखी 2 ते 4 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये कडाक्याची थंडी वाढणार आहे.

राज्यातील इतर ठिकाणी देखील हळूहळू तापमान घटत आहे. जळगावमध्ये किमान तापमान 8 अंशांपर्यंत खाली घसरले, तर रत्नागिरीत सर्वाधिक 34.5 अंश तापमान नोंदवले गेले. सातपुड्यातील डोंगररांगांमध्ये सध्या थंडीचा प्रचंड परिणाम होतो आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment