---Advertisement---

Stock Market Closing : भारतीय शेअर बाजारात ‘हाहाकार’; गुंतवगणुकदारांचे एकाच दिवसात 12 लाख कोटी स्वाहा

by team
---Advertisement---

Stock Market Closing : आठवड्याचा पहिला दिवस सोमवार हा भारतीय शेअर बाजारासाठी Black Monday ठरला आहे. सेन्सेक्स-निफ्टी हे दोन्ही बाजार निर्देशांक मोठ्या घसरणीने उघडले आणि बाजार बंद होईपर्यंत घसरत राहिले. एकीकडे, मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स १०४८ अंकांच्या घसरणीसह बंद झाला, तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३४५ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. दरम्यान, लार्ज कॅप ते स्मॉल कॅपपर्यंत सर्व मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विखुरलेले दिसले.

आजच्या घसरणीमुळे, 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेली सर्व तेजी बाजाराने गमावली आहे. प्रमुख निर्देशांकात आज चौफेर विक्री दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 4% पर्यंत घसरले. निफ्टी आणि सेन्सेक्स 1.4% घसरणीसह बंद झाले.

आज मिडकॅप निर्देशांकात 8 महिन्यांनंतर एक दिवसाची सर्वात मोठी घसरण झाली. 5 महिन्यांनंतर आज एका दिवसातील सर्वात मोठी घसरण स्मॉल कॅपमध्ये दिसून आली.

कोणते शेअर्स घसरले?

आज राष्ट्रीय शेअर बाजारात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. तर ट्रेंटचे शेअर्सही जवळपास 6 टक्क्यांनी घसरले आहेत. बीपीसीएलच्या शेअर्समध्ये 4.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. बीईएल आणि अदानी पोर्टचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले.

झोमॅटोचे शेअर्स सुमारे 7 टक्क्यांनी, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 3 टक्क्यांनी घसरले. याउलट, ॲक्सिस बँक, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एनएसईवर एक टक्क्यापेक्षा कमी वाढ झाली आहे.

बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 13 जानेवारी रोजी 417.28 लाख कोटी रुपयांवर आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार 10 जानेवारीला 429.67 लाख कोटी रुपये होते.

अशा प्रकारे, BSE मध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 12.39 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment