आठवड्यातील दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार चांगलाच कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.मंगळवारी BSE सेन्सेक्स 950 अंकांनी घसरला आणि NSE निफ्टी देखील 24,500 अंकांच्या खाली बंद झाला आहे. या घसरणीमागील प्रमुख कारणे म्हणजे एफपीआयने केलेली विक्री व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीवर होणारा परिणाम ही कारणे असल्याचं बोल्ल जात आहे.
मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी व्यतिरिक्त बँक निफ्टी, एसएमई निर्देशांक आणि शेअर बाजारातील इतर सर्व निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली आहे. ऑक्टोबर महिना हा भारतीय शेअर बाजारासाठी निराशाजनक राहिलेला आहे.
यासोबतच, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) ऑक्टोबरमध्ये भारतीय शेअर बाजारातून 82,000 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. FPIच्या विक्री मागे प्रमुख कारण म्हणजे चीनच्या अर्थव्यवस्थेतील विदेशी गुंतवणूकदरांचा वाढत कौल आहे.
आतापर्यंतची सर्वात मोठी पैसे काढणे
ऑक्टोबरमध्ये FPIs ने भारतीय शेअर बाजारातून आपले 82,479 कोटी रुपये काढून घेतले. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात शेअर बाजारातील ही सर्वात मोठी नफा वसुली आहे. यापूर्वी शेअर बाजारातव असं चित्र कोविडच्या काळात पाहायला मिळालं होत. त्यावेळी मार्च 2020 मध्ये FPI ने 65,816 कोटी रुपये बाजारातून काढले होते.