---Advertisement---

Stock Market : शेअर बाजारात मोठी घसरण; निफ्टीचे सर्व निर्देशांक लाल चिन्हावर

by team
---Advertisement---

आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात देशांतर्गत शेअर बाजाराने मोठ्या घसरणीने केली. सेन्सेक्स सुमारे ८०० अंकांच्या घसरणीने उघडला. निफ्टी देखील २२५ अंकांच्या घसरणीने उघडला. बँक निफ्टी ४६० अंकांनी घसरला. तर  मिडकॅप निर्देशांकही  ८०० अंकांनी घसरला.

निफ्टीचे सर्व निर्देशांक लाल चिन्हावर होते. सर्वात मोठी घसरण रिअॅल्टी शेअर्समध्ये झाली. त्यासह मेटल, पीएसयू बँक, ऑटो, कंझ्युमर ड्युरेबल्समध्येही मोठी घसरण झाली.

या शेअर्स मध्ये मोठी घसरण

बीपीसीएल, पॉवर ग्रिड, अपोलो हॉस्पिटल, एम अँड एम, बीईएल सारख्या शेअर्सना सर्वाधिक तोटा झाला.  परंतु एशियन पेंट, टाटा स्टील, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँकमध्ये सर्वात मोठी घसरण झाली.

जागतिक बाजारपेठेतील अपडेट

मजबूत रोजगार आकडेवारीने दर कपातीच्या आशा धुळीस मिळाल्यानंतर शुक्रवारी अमेरिकन बाजार घसरले. डाउ सुमारे ७०० अंकांनी घसरला आणि नॅस्डॅक ३२० अंकांनी घसरला. गिफ्ट निफ्टी १८८ अंकांनी घसरून २३३१२ वर पोहोचला. डाउ फ्युचर्स स्थिर होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment