---Advertisement---
Jalgaon Gold Rate : जळगाव सुवर्णपेठेत आज, सोमवारी सोने-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. अर्थात २२ कॅरेट सोने दर ₹१,१७,२५०, तर २४ कॅरेट सोने दर १,२८,००० रुपयांवर पोहोचला आहे. तसेच चांदीचा दरातही वाढ झाली असून, ती १,७४,००० प्रति किलोवर पोहोचली आहे.
धातू कॅरेट आजचा दर
22 कॅरेट सोने ₹१,१७,२५० प्रति तोळा
24 कॅरेट सोने ₹१,२८,००० प्रति तोळा
चांदी ₹१,७४,००० प्रति किलो
एमसीएक्सवर सोन्याच्या किमती ०.८७ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,३०,६३१ रुपये झाल्या, तर चांदीच्या किमती १.५२ टक्क्यांनी वाढून प्रति किलोग्रॅम १,७७,६४७ रुपये झाल्या. वाढत्या जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत मागणीत वाढ झाल्यामुळे दागिन्यांची मागणी वाढतेय, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
शिवाय, व्यापाराच्या वेळेत व्यत्यय आणि पुरवठ्याच्या कमतरतेमुळे चांदीच्या किमती वाढल्या आहेत. शुक्रवारी, शिकागो मर्केंटाइल एक्सचेंजमधील फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंग डेटा सेंटरमध्ये झालेल्या गोंधळामुळे व्यापार काही तासांसाठी थांबला. यामुळे परकीय चलन, बाँड, इक्विटी आणि कमोडिटी मार्केटमधील व्यापार थांबला.









