जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी एमसीव्ही महेश्वरी रेड्डी यांची वर्णी लागली आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची पदोन्नतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवार, ३१ रोजी सायंकाळी दिलेल्या आदेशानुसार कळविले आहे.