मोठी बातमी! जळगावात जुनी इमारत कोसळली, अनेक लोकं दबले, बचावकार्य सुरु

जळगाव : शहरातील शिवाजी महाराज नगरात आज सकाळी नऊ वाजता जुनी इमारत कोसळली. यात राजश्री पाठक (५२) या गृहिणी अडकल्या असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मनपा पथकाने बचाव मोहीम सुरू केलीय. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे.

या इमारतीत अडकलेल्या एका पुरुषाला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. शहरात अनेक जुन्या इमारती असून मनपा प्रशासनाने इमारत मालकांना यापूर्वोच नोटिसा बजावून त्या खाली करण्याचे बजावले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक घटनासाठी दाखल झाले आहेत.