विद्यार्थी-पालकांसाठी सर्वात मोठी बातमी; विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार

तरुण भारत लाईव्ह । २५ मे २०२३। महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणारं दप्तराचं ओझं कमी व्हावं यासाठी मार्ग काढला आहे. बालभारतीने विद्यार्थ्यांसाठी चार भागांमध्ये पुस्तकांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना एकच पुस्तक घेऊन जावं लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या दप्तराचं ओझं कमी होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं हे ओझं कमी व्हावं, अशी मागणी सातत्याने पालकांकडून केली जात होती. बालभारतीने यावर अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या पाठीवरचा भार जवळपास 75 टक्क्यांनी कमी होणार आहे. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचं पुस्तक सोपं होणार आहे. विद्यार्थ्यांना आता सगळ्या विषयांचे वेगवेगळे पुस्तकं घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

कारण एकाच पुस्तक सर्वत विषयांचे पाठ असणार आहेत. विशेष म्हणजे अभ्यास करताना विद्यार्थ्यांना महत्त्वाची नोंद करता यावी यासाठी पुस्तकातच वहिची पानं जोडण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी होणार आहे.

बालभारतीकडून पुस्तकांचे एकूण 4 भाग करण्यात आले आहेत. या भागांमध्ये वेगवेगळे विषय अंतर्भूत करण्यात आले आहेत. उदारणार्थ एकाच पुस्तकात सर्व विषयांचे पाठ असतील. पण ते चार भागांमध्ये असतील. प्रत्येक विषयाचे दोन किवा तीन पाठ पुस्तकात असतील. विशेष म्हणजे पुस्तकांना वहीचं पानदेखील असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुस्तकावरच लिहिता येणार आहे.

विशेष म्हणजे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं 75 टक्क्यांनी कमी होणार आहे. पुस्तकाची विभागनी चार भागात करण्यात आली आहे. यातला पहिला भाग हा दोन ते अडीच महिने शिकवला जाईल. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यात शिकवला जाईल. तिसरा भाग हा दुसऱ्या सत्रात दोन ते अडीच महिन्यात शिकवला जाईल. शेवटचा चौथा भागही दोन ते अडीच महिन्यात शिकवला जाईल.

 

अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाठ्यपुस्तकाच्या रचनेत कोणत्याच प्रकारचा बदल नाही. फक्त पाठ्य पुस्तकात वह्यांची पानं टाक्यात आली आहेत. तसेच सर्व विषय एकत्रित करुन चार भागात पुस्तकाची विभागणी करण्यात आली आहे. अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णाकुमार पाटील यांनी दिली.