मोठी बातमी : नरेंद्र मोदींची आई रुग्णालयात दाखल

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२२ ।   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या आई हीराबेन मोदी यांना 27 डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिराबेन यांची प्रकुती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे

पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त असल्याने आरोग्याबाबत अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यांची सध्याची प्रकृती काय आहे, आणखी त्याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.  रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार  हिराबेनची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदी अहमदाबाद ला रवाना होणार

हिराबेन यांना अहमदाबाद येथील युएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे मुख्य सचिव के कैलाशनाथन हे रुग्णालयात पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी देखील आईच्या भेटीसाठी अहमदाबाद ला रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे

काही दिवसांपूर्वीच मोदी व त्यांच्या आईंची भेट 
PM मोदी यांच्या आई हिराबेन यांनी १८ जूनला १००वा वाढदिवस साजरा केला होता. तेव्हा मोदींनी गांधीनगर येथील निवासस्थानी येऊन आईची भेट घेतली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी पीएम मोदींनी मेहता रुग्णालयाला भेट दिली होती. या रुग्णालयातील नव्या सुविधांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले होते. गुजरात विधानसभेत भाजपचा विजय झाल्यानंतर मोदींनी राज्याला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी आई पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली होती. अहमदाबाद विमानतळावरून ते थेट निवासस्थानी गांधीनगर येथे घरी गेले होते. ४५ मिनिटे आईची भेट घेऊन मग ते पक्ष कार्यालयात गेले होते.