तरुण भारत लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२२ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रल्हाद मोदी यांच्यासह गाडीमध्ये मुलगा आणि सून प्रवास करत होते. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले असून, उपचारांसाठी त्यांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसूर जवळील कडकोल्ला परिसरात हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
PM Narendra Modi's brother Prahlad Modi meets with accident in Karnataka's Mysuru. https://t.co/KY39rjK160 pic.twitter.com/V6rAlFuTgY
— Nakshab (@NakshabMawanvi) December 27, 2022
प्रल्हाद मोदी हे गुजरात फेअर प्राइस शॉप्स अँड केरोसीन लायसन्स होल्डर असोसिएशनचे प्रमुख आहेत. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एका सामाजिक कार्यक्रमात गुजरातच्या जनतेने भाजपला निवडून दिले आहे. 2024 मध्येही येथील सत्ता भारतीय जनता पक्षाकडेच राहील असा विश्वास मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींनी व्यक्त केला होता.