IPO : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे. नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आयपीओ शेअर मार्केटमध्ये येणार आहेत. यामध्ये एनटीपीसी ग्रीन, एनर्जी मोबिक्विक आणि स्विगी सारख्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. सेबीकडून या कंपन्यांच्या आयपीओला परवानगी यापूर्वीच मिळाली आहे.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील नवीकरणीय ऊर्जा कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ देखील लवकरच येणार आहे. एनटीपीसीच्या आयपीओवर देखील गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय.
निवा बूपा हेल्थ इन्शुरन्स
निवा बूपा आरोग्य विमा कंपनी आहे. आरोग्य विमा क्षेत्रात या कंपनीचा वाटा 16.24 टक्के आहे. स्टार हेल्थनंतर आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी आहे.
एक्मे सोलर होल्डिंग्स
एक्मे सोलर होल्डिंग्स हीं कंपनी सौर ऊर्जा प्रकल्प चालवते.इंजिनियरिंग, प्रोक्यूरमेंट, कंस्ट्रक्शन, ऑपरेशन्स आणि मेंटेनेंस देखील करते. एक्मे सोलर होल्डिंग् केंद्र आणि राज्य सरकारला वीज विकून उत्पन्न मिळवते.
स्विगी
स्विगीचा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी 6 नोव्हेंबराल खुला होईल. स्वीगीचा आयपीओ जवळपास 11800 कोटी रुपयांचा असेल. यामध्ये ऑफर फॉर सेलद्वारे शेअरची विक्री केली जाईल. या आयपीओवर झोमॅटोची देखील नजर असेल.
झिंका लॉजिस्टिक्स
ही कंपनी ट्रक ऑपरेटर्सला वेगवेगळ्या सेवा पुरवते. या कंपनीचा आयपीओद्वारे 550 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. पेमेंट मॅनेजमेंट, टेलीमेटिक्स आणि वाहन वित्त सेवा पुरवते. कंपनीनं मार्च 2024 पर्यंत जवळपास 200 कोटींच्या कर्जाचं वाटप केलं आहे.