Assembly Election 2024 Results: महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. दरम्यान, निकालांवर अवलंबून असलेल्या या सर्व तयारीने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणखी चुरशीची झाली आहे. सायंकाळपर्यंत महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा चेहरा स्पष्ट होईल.
राज्यात 107 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचे पाहायला मिळते. पहिल्या कौलनुसार महायुतीला 193 जागांवर आघाडी मिळाली असून 89 जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.
अशातच ज्या घडामोडींमुळे सत्तासंघर्ष उद्भवला, त्या घडामोडी म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांतील बंडखोरी. अगदी शिवसेनेतील फुटीपासून महाविकास आघाडी कोसळणं आणि थेट शिवसेनेतील प्रबळ नेतृत्त्व असलेले एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यापर्यंत अनेक हादरवणाऱ्या घटना महाराष्ट्रानं पहिल्या होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत बंडावेळी गेलेल्या आमदारांचं काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानूसार गुवाहाटीला गेलेले सर्व आमदार आघाडीवर असल्याचं समोर येत आहे.