---Advertisement---

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांकडून मोठी अपडेट!

by team
---Advertisement---

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. या योजनेच्या १५०० रुपयांची महिलांना प्रतीक्षा लागली आहे. शासनाकडून अर्ज पडताळणी सुरु असल्याने या हप्त्याला उशीर झाल्याची माहिती आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते सोबत मिळतील अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या योजनेबाबत भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अतिशय चांगला, अतिशय संतुलित अर्थसंकल्प आम्ही मांडू, जरी वेगवेगळ्या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली साधनसंपत्ती कशी वाढवली जाईल. कुठल्याही परिस्थितीत भांडवली खर्चावर त्याचा परिणाम होणार नाही. भांडवली खर्चासाठी काय वेगवेगळ्या पद्धती असतील याचा विचार करतो आहोत.”

“राज्यातील कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काहीही नाही. या योजनेत पात्र असलेल्यांना पैसे दिले जातील. पंरतु जे नियमाच्या बाहेर आहेत, त्यांना या योजनेतून बाहेर ठेवावे लागणार आहे. त्यामध्ये विरोधकांनी म्हटलं की १० लाख नावं कमी झाली वगैरे… त्याबाबत ‘कॅग’ने आपल्यावर बंधन टाकले आहे. त्यानुसार, एखादी योजना सुरु पात्र लोकांनाच आर्थिक मदत देण्यात येते, अपात्र लोकांना मदत करता येत नाही. आम्ही त्यापुरती कारवाई केलेली आहे. बाकी देशात अशा प्रकारच्या योजनांमध्ये सर्वात जास्त लोकांना शासकीय मदत देणारे राज्य महाराष्ट्र ठरणार आहे हा विश्वास देतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा लवकरच संपणार

शासनाकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची अर्ज पडताळणी सुरु असल्याने या हप्त्याला उशीर झाल्याची माहिती आहे. मात्र आजपासून (सोमवार) फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळू शकतात, असेही बोलले जात आहे. म्हणजेच मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे ३००० रुपये मिळू शकतात, असेही म्हटले जात आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment