Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी बाबत मोठी अपडेट… भारत आपले सामने कुठे खेळणार? आयसीसीने केले स्पष्ट

#image_title

Champions Trophy 2025: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आता ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये भारत आपले सामने दुसऱ्या देशात खेळणार आहे.

यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळवली जाईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळणार नाही. जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर या स्पर्धेतील विजेतेपदाचा सामनाही पाकिस्तानमध्ये होणार नाही.

2025 मध्ये महिला क्रिकेट विश्वचषकही होणार आहे, ज्याचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. तर पुरुषांचा टी-२० विश्वचषक 2026 मध्ये खेळवला जाणार आहे.

या T20 विश्वचषक 2026 चे यजमानपद भारत आणि श्रीलंकेला संयुक्तपणे देण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे पाकिस्ताननेही आयसीसीची कोणतीही स्पर्धा किंवा अन्य कोणताही सामना भारतात खेळण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत पाकिस्तान संघ श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात आपले सामने खेळणार आहे.

2028 पर्यंत आयसीसीच्या सर्व स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित केल्या जातील, असेही त्यांच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2028 च्या यजमानपदाचे अधिकार पाकिस्तानला देण्यात आले आहेत. यामध्येही हायब्रिड मॉडेल लागू होईल. यानंतर 2029-31 मध्ये ऑस्ट्रेलियात सीनियर महिलांची स्पर्धाही होणार आहे.

असे आहेत  ICC चे निर्णय

– पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळणार आहे. पण भारतीय संघ आपले सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळणार आहे.

– ही 50 षटकांची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान म्हणजेच 2025 मध्ये खेळवली जाईल.

– 2024 ते 2027 दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व ICC टूर्नामेंटमध्ये हायब्रीड मॉडेल लागू होईल.

– महिला विश्वचषक 2025 आणि पुरुषांच्या T20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर येणार नाही.

– चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल