थिरुवनंतपुरम : तिसऱ्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे. भारताचे 391 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानाच उतरलेल्या लंकाचा संपूर्ण डाव 73 धावात संपुष्टात आला. भारताने सामना 317 धावांनी जिंकत मोठा विजय साजरा केला.
भारताचे 391 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. मोहम्मद सिराजने असलंका फर्नांडोला 1 तर कुसल मेंडीसला 4 धावांवर बाद करत पहिले दोन धक्के दिले. त्यानंतर मोहम्मद शमीने चरिथ असलंकला 1 धावेवर बाद करत लंकेची अवस्था 3 बाद 31 धावा अशी केली. सिराजने लंकेला अवघ्या 4 धावात चौथा धक्का दिला. त्याने नुवानिदू फर्नांडोचा 19 धावांवर त्रिफळा उडवत लंकेची 8 व्या षटकात 4 बाद 35 धावा अशी अवस्था केली.
श्रीलंकेची टॉप ऑर्डर उडवल्यानंतर सिराज आणि शमीने लंकेची अवस्था 5 बाद 37 धावा अशी केली होती. त्यानंतर सिराजने करूणारत्नेला धावबाद करत लंकेला सहावा धक्का दिला. पाठोपाठ कुलदीप यादवने लंकेचा कर्णधार शानकाला 11 धावांवर बाद केले. शमीनेही दुनिथची शिकार करत लंकेची अवस्था 8 बाद 51 धावा अशी केली.