बिहारच्या मुजफ्फरपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांतच आपल्या प्रियकरासोबत पलायन केले आहे. या महिलेचा पती बाहेरगावी नोकरीसाठी राहतो. विशेष म्हणजे, 24 एप्रिल रोजी तिचे लग्न झाले होते, मात्र एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच ती पळून गेली आहे.
महिलेच्या पतीने बाहेरगावी राहून तिच्यासाठी एक स्मार्टफोन खरेदी केला होता आणि गिफ्ट म्हणून तिला दिला होता. मात्र, त्या फोनद्वारे ती तिच्या प्रियकराशी सतत संपर्कात होती. शेवटी, व्हॅलेंटाइन वीकदरम्यान तिने घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन प्रियकरासोबत पलायन केले.
हेही वाचा : Crime News: जालन्याची मोनिका ठरली ‘लव्ह जिहाद’ची बळी; शेतात नेत इरफानने केले असे की, अंगावर येईल काटा
ही घटना साहेबागंज क्षेत्रातील रामपूर असली गावातील आहे. 10 फेब्रुवारीच्या रात्री या महिलेने सासू-सासऱ्यांना जेवण वाढले आणि त्यांच्या झोपण्याची वाट पाहू लागली. नंतर, घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेऊन ती प्रियकरासोबत बाइकवर बसून निघून गेली. रात्री सासू-सासऱ्यांना बाइकचा आवाज ऐकू आला, पण त्यांना काही संशय आला नाही. मात्र, सकाळी उठल्यानंतर सून घरात नसल्याचे लक्षात येताच ते हादरून गेले. त्यांनी तातडीने मुलाला फोन करून याबाबत माहिती दिली आणि नंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा : धक्कादायक ! चार महिन्यांपूर्वीच मिळाली नोकरी अन् अपघातात संपले नव्या भविष्याची स्वप्ने, १ ९ वर्षीय पोस्टमास्तरचा दुर्दैवी मृत्यू
महिलेच्या पतीने सांगितले की, तिचे लग्नाआधीच कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. पतीला याची कल्पना मिळाल्यानंतर त्यांच्यात यावरून अनेकदा वाद झाले. पती बंगळुरूमध्ये मजुरीचे काम करत होता आणि आपल्या संपूर्ण कमाईचा पैसा पत्नीच्या बँक खात्यात पाठवत होता. मात्र, त्यानंतरही पत्नीने विश्वासघात केला आणि प्रियकरासोबत फरार झाली.
यावर पतीने स्पष्ट केले आहे की, “ती परत आली तरी मी तिच्यासोबत नांदणार नाही.” पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि महिलेचा शोध सुरू आहे.