---Advertisement---
पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला पुन्हा चर्चेच्या टेबलावर घेण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांमधील सर्व प्रलंबित मुद्दे केवळ व्यापक संवादाद्वारेच सोडवले जाऊ शकतात, असेही ते म्हणाले. पश्चिमेकडील संसदीय
शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे बिलावल यांनी बुसेत्सच्या दौन्यादरम्यान जर्मन प्रसारक डीडब्ल्यू उर्दूला दिलेल्या मुलाखतीत ही टिप्पणी केली. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व प्रलंबित मुद्दे केवळ व्यापक संवादाद्वारेच सोडवले जाऊ शकतात.
जर भारत टेबलावर आला नाही तर ते त्यांच्या फायद्याचे ठरणार नाही. पाकिस्तानचा पाणीपुरवठा रोखण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न अस्तित्वाचा धोका म्हणून पाहिला जाईल, ज्यामुळे पाकिस्तानला युद्धाशिवाय पर्याय राहणार नाही. एक दिवस आधी, बिलावल यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताला चर्चेसाठी टेबलावर आणण्याचे आणि दक्षिण आशियात कायमस्वरूपी शांतता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित संवादाद्वारे आपली भूमिका बजावण्याचे आवाहन केले ज्यामध्ये दीर्घकाळ प्रलंबित काश्मीर प्रश्न, पाणी प्रश्न आणि दहशतवाद यांचा समावेश आहे. फक्त व्याप्त काश्मीर आणि दहशतवादावरच चर्चा करणार असल्याचे भारताने स्पष्ट केले.
पाण्याच्या हक्काशी तडजोड नाही
जनरल परवेझ मुशर्रफ शासक असताना २००३ मध्ये संयुक्त संवाद सुरू करण्यात आला होता. त्यात दोन्ही देशांमधील सर्व वादग्रस्त मुद्यांचा समावेश असलेले आठ घटक होते. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर ही चर्चा थांबली आणि पुन्हा सुरूच झाली नाही. बिलावल यांनी पुनरुच्चार केला की पाकिस्तान शांततेचा पुरस्कार करत असला तरी, पाणी सुरक्षेसारखे मुद्दे अवाजवी आहेत. पाकिस्तान युद्ध करू इच्छित नसला तरी तो त्याच्या राष्ट्रीय सुरक्षेशी किंवा पाण्याच्या हक्कांशी तडजोड करणार नाही.