Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रातील २८८ विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. दरम्यान, निकालांवर अवलंबून असलेल्या या सर्व तयारीने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणखी चुरशीची झाली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये महाराष्ट्रात भाजपची राजकीय त्सुनामी आल्याचे दिसून आले. राज्यातील एकूण २८८ मतदारसंघांपैकी तब्बल १३२ मतदारसंघांमध्ये एकट्या भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. हे भाजपसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहे.
महाराष्ट्रात २०१९ साली आलेल्या भाजपच्या मोदी लाटेपेक्षाही मोठी लाट यंदा आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते अजूनही पिछाडीवर महायुतीने राज्यात मॅजिक फिगर ओलांडली आहे. दरम्यान, गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांवरून महाराष्ट्रात महायुतीची लाट नाहीतर त्सुनामी आल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदा भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांमध्ये भाजप १२६ जागांच्याही पुढे आहे. २०१९ साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. मात्र आता त्याही पुढे जात भाजप १२६ जागांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यात भाजपा-महायुतीची लाट आल्याचे दिसून आले आहे. भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.