भाजपकडून पहिल्या यादीत ‘या’ तीन आमदारांना डच्चू …’यांना’ दिली संधी

#image_title

BJP Candidates List : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत भाजपने 99 उमेदवारांना संधी दिली आहे. यात 13 महिलांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम ठेवली आहे. मात्र तीन विद्यमान उमेदवारांना या यादीनुसार डच्चू देण्यात आला आहे.
कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरण प्रचंड भोवलं आहे. कारण तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. त्यामुळे गणपत गायकवाड यांचं विधानसभेचं तिकीट देखील कापलं गेलं आहे. गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरं तिकीट कापलंय ते कामठी चे आमदार टेकचंद सावरकर यांचं. यावेळी त्यांच्याजागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल केलेलं वक्तव्य आमदार सावरकरांना भोवल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अश्विनी जगताप यांच्याऐवजी भाजपकडून शकंर जगताप याना उमेदवारी देण्यात आली आहे.