तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। दक्षिण दिल्लीमध्ये ग्रेटर कैलास भागात भाजपच्या युवा जिल्हा महासचिवाने आत्महत्या केली आहे. भाजप नेते करण बंका यांनी आत्महत्या केली आहे,करण बंका हे सध्या आर्थिक अडचणीत असल्याचंही समोर आलं आहे.करण बंका यांनी त्यांच्या पीएसओच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडली आहे.
त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार करण बंका बाथरूममध्ये घसरले आणि डोक्याला मार लागून दुखापत झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र जेव्हा पोलिसांचे पथक मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा करण यांनी बाथरूममध्ये स्वत:वर गोळी झाडल्याचे दिसून आले.तपासादरम्यान करणने आत्महत्येसाठी वापरलेले पिस्तूल त्याच्या पीएसओचे असल्याचे पोलिसांना समजले.सध्या पोलीस प्रत्येक बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.