संसद भवनात प्रताप चंद्र सारंगी यांच्या जखमी होण्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. सारंगी यांनी राहुल गांधींवर आरोप केला की, त्यांनी धक्का दिल्यामुळे ते पायऱ्यांवरून पडले. या घटनेमध्ये सारंगी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सारंगी यांच्या म्हणण्यानुसार, ते संसद भवनाच्या पायऱ्यांवर उभे होते. याचवेळी राहुल गांधींनी त्यांना धक्का दिला, ज्यामुळे दुसरा खासदार त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत सारंगी यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले.
दुसरीकडे, यावर राहुल गांधींनी पलटवार करत भाजप खासदारांवर आरोप केला की, त्यांना संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर रोखले आणि धक्काबुक्की केली. आम्हाला संसदेत प्रवेशाचा अधिकार आहे, मात्र भाजप खासदारांनी हा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला.”
दरम्यान, संसदेत सारंगी यांची जखमी होण्याची घटना घडल्याने वाद अधिक तीव्र झालाय. भाजप खासदारांनी काँग्रेसवर खोटे आरोप करण्याचा आरोप केला आहे.
त्यांनी सांगितले की, “राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारे वाद निर्माण केला आहे. त्यांनी सारंगी यांना ढकलल्याचा पुरावा आहे, आणि या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे.”