मुंबई : विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश तिळेकर आणि अमित गोरखे यांना यांचा समावेश आहे.
राज्यात १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपले ५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यायन त्यांचा राजकीय वनवास संपला आहे. लोकसभेतील पराभवानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छूक होते. परंतु या पाच जणांनी बाजी मारली आहे. मागील पाच वर्षांपासून पंकजा मुंडे ह्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. त्यांना २०१९ च्या विधान सभा निवडणुकीत तिकीट मिळाले नव्हते. यानंतर त्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले होते. परंतु, पक्षाने त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली नव्हती. आता त्यांना नुकतीच लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, बजरंग सोनवणे यांनी त्यांना पराभूत केले होते. यानंतर पुन्हा पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर आता विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, महादेव जानकरासंह माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार निलय नाईक, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, भाजप नेत्या माधवी नाईक यांचीही नावे विधान परिषदेसाठी चर्चेत होती.