---Advertisement---
जळगाव : येथील भाजप जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जळगाव पश्चिम जिल्हाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सेवा. सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, परदेशी भूमीवरून स्वातंत्र्य लढ्याला दिलेली चालना, साहित्यलेखन, सामाजिक समरसता यासाठी घेतलेला पुढाकार आदी विषयांवर प्रकाश टाकला.
जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, जळगाव महानगर जिल्हा सरचिटणीस अरविंद देशमुख, जिल्हा चिटणीस मनोहर पाटील, जनजाती मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मंडल अध्यक्ष मिलिंद चौधरी, भाऊसाहेब पाटील, अमित देशपांडे, मा. संजय भोळे, मा. हर्षल चौधरी, मा. संजय चौधरी, मा. सुदाम राजपूत, मा. गिरीष वराडे, मा. ललित बऱ्हाटे, मा. संदीप तेले, मा. दिलीप नाझरकर, मा.संजय पाटील, कार्यालय मंत्री योगेश पाटील आदी उपस्थित होते.

भाजप जळगाव जिल्हा महानगरातर्फे अभिवादन
भाजप जळगाव जिल्हा महानगरातर्फे बुधवारी सकाळी ९:३० वाजता स्वातंत्र्य चौकातील स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या पुतळ्याला माल्यापण करून अभिवादन करण्यात आले. भाजप जिल्हा अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते माल्यापण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे, वंदे मातरम्, भारत माता की जय, असे जयघोष करण्यात आले.
ज्येष्ठ माजी पदाधिकारी भगत भाई बालानी ,जिल्हा महानगर पदाधिकारी राजू मराठे ,राहुल वाघ ,विशाल त्रिपाठी ,प्रकाश बालानी , विजय वानखेडे ,मनोज भांडारकर ,प्रकाश पंडित मंडल अध्यक्ष सौ दीपमाला काळे, विनोद मराठे, आनंद सपकाळे, तसेच संजय शिंदे शक्तिमान महाजन सुशील हसवानी दीपक बाविस्कर सुनील सरोदे भरत कर्डिले उमेश देशपांडे महेश चौधरी तुषार सूर्यवंशी दिलीप नाझरकर राहुल लष्करे रवी सोनवणे सुनील वाणी अरुण राऊत केतन मेटकर जितेंद्र चव्हाण, यासह असंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
---Advertisement---
