तरुण भारत लाईव्ह । जळगाव : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दि. ११ मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या संघटनात्मक दौऱ्यावर येत आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्रभर संघटनात्मक दौरा करीत असून, त्या अंतर्गत मंगळवारी ते जळगावला येतील. त्यांच्या उपस्थितीत दिवसभर विविध बैठका, मेळावा, सामाजिक बैठका, दुचाकी रॅली, असे अनेक कार्यक्रम होणार आहेत.
त्यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित राहतील.