नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिंडोरी जनसभेला येत आहे. त्यामुळे यासंदर्भातील सर्व माहिती देण्यासाठी भुजबळ यांच्याकडे आलो असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, बावनकुळे यांनी शांतिगिरी महाराज यांच्या अनुयायांची भेट घेतली आहे.
ते पुढे म्हणले की, पश्चिम महाराष्ट्राच्या, महायुती प्रचारात भुजबळ यांचे महत्वाचे स्थान आहे. भुजबळ यांचा अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला कामी येणार. त्यामुळे सभेच्या नियोजनाच्या बाबत चर्चा झाली. नाशिकच्या जागेबाबाबत एकनाथ शिंदे यांनी निर्णय घ्यायचा आहे. भाजपा आणि राष्ट्र्वादीने चर्चा करावी असे आमचे मत होते. मला असे वाटते की एकनाथ शिंदे याबाबत अंतिम निर्णय करतील. शांतिगिरी महाराज यांच्या अनुयायांनी भेट घेऊन चर्चा केली. परंतु, एकनाथ शिंदे यांनी अंतिम निर्णय करायचा आहे. एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील त्याला ५१ % मते कसे मिळतील यासाठी म्हणून राष्ट्रवादी आणि भाजपा महायुती म्हणून प्रयत्न करतील. महायुतीचा प्रचाराचा सेट अप तयार आहे, एकनाथ शिंदे यांनी फक्त निर्णय घ्यायचा आहे. महायुतीत म्हणून आम्ही एकत्र आहोत ,पक्षीय राजकारणात त्यांनी निर्णय करायचा आहे. जनतेची निवडणूक आहे. नाशिककरांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. पालघर मतदारसंघ हा भाजपासाठी निश्चित होईल आणि त्यानुसार भाजपा उमेदवार जाहीर करेन असे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयाने ओबीसी संघटनांमध्ये नाराजी असल्याचा प्रश्नला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, छगन भुजबळ यांनी आयुष्यभर १२ बलुतेदार, १८ पगड जाती यांच्यासाठी काम केले आहे. मोठ्या प्रमाणात समर्थन असल्यामुळे नेत्याचे नाव चर्चेत येते आणि समर्थक तयारी करतात. त्यामध्ये काहीही गैर नाही. निर्णय वेगळा झाला की, संघटनांची नाराजी साहजिक आहे. छगन भुजबळ राज्यातील मोठे नेते आहे, काही काळ नाराजी असणार आहे. आपला नेता लोकसभा, विधानसभेत जावा अशी समर्थकानाची इच्छा असते. परंतु ही तात्पुरती नाराजी असते. भुजबळ यांनी आवाहन केले की नाराजी दूर होईल.
ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला पाठींबा राहिला आहे. महायुतीत नाराजी नाही,जागावाटपात थोडी तडजोड करावी लागते. माझा कोणताही संपर्क विजय करंजकर यांच्याशी झालेला नाही. सीटिंग सीट ही शिवसेनेची आहे त्यामुळे महायुतीत ही तडजोड करण्यात आली. उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.