जळगाव महापालिकेतील भाजपाचे चार नगरसेवक अपात्र, काय प्रकरण?

जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणी महापालिकेतील भाजपचे चार नगरसेवक गुरुवारी जळगाव जिल्हा न्यायालयाने अपात्र ठरवले. उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सदर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी, याबाबत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल होती. यावर जिल्हा न्यालयाचाने आज १३ रोजी निकाल देत पाच पैकी चार नगरसवेकांना अपात्र ठरवले आहे.

पाच नगरसेवकांपैकी दत्तू कोळी यांच्या शिक्षेला स्थगिती,  इतर चार नगरसेवक लता भोईटे, भगतभाई बालानी, कैलास सोनवणे, सदाशिवराव ढेकळे यांना न्यायालयाने अपात्र ठरवले आहे. याचिकाकर्तेकडून ॲड.सुधीर कुलकर्णी यांनी काम पाहिले.