चंदीगड : लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या हरियाणा व जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. हरियाणा विधानसभेसाठी राज्यातील २.०३ कोटी मतदारांनी ५ ऑक्टोबर रोजी मतदान केले. या दोन्ही राज्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. यात हरियाणात भाजपने कमालीची अघाडी घेतली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार, विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी ४ ८ जागांवर भाजप, 3७ मतदारसंघांमध्ये काँग्रेस, लोक दल 2 आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. हरियाणा विधानसभेत सत्तास्थापन करण्यासाठी ४६ ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप (BJP) सहजपणे सत्ता स्थापन करेल असे चित्र सध्य आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाने २९ जागांवर आघाडी घेतली आहे .काँग्रेसने ४६ जागांवर, आघाडीपीडीपीने ४ जागांवर आघाडी घेतली आहे.तर १ १ अपक्ष आणि इतर उमेदवार आघाडीवर आहे.
जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचे निकाल पुढे येत आहेत. दरम्यान, हरियाणामध्ये भाजपने आघाडी घेतली असून आतापर्यंत ४८ जागांवर तर काँग्रेस आतापर्यंत ३७ जागांवर आघाडी घेतली आहे. यात भाजपने २ जागांवर तर काँग्रेसने ५ जागांवर विजय संपादित केला आहे. या दोन्ही राज्यातील निकाल थोड्या वेळात स्पष्ट होईल. मात्र, सध्या दोन्ही ठिकाणी अटीतटीचं चित्र दिसत आहे.
हरियाणातील सुरुवातीचे ट्रेंड कालानुरूप कसे बदलले हे पाहण्यासारखे आहे. निवडणुकीचे निकाल अजून लागलेले नाहीत, पण भाजपने ज्या पद्धतीने अचानक आघाडी घेतली आहे. एक्झिट पोलमध्ये लढतीतून बाहेर दिसलेला भाजप ट्रेंडमध्ये आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. हरियाणात भाजपविरोधात कुमारी शैलजा यांच्या माध्यमातून दलित कार्ड, दुसरा खर्च आणि स्लिप्सचा आरोप आणि तिसरा, मुख्यमंत्री बदलचा आरोप करण्यात आला होता. मात्र , या तिन्ही घटकांचा कोणताही परिणाम भाजपला जाणवला नसल्याचे हरियाणा निकालातून दिसून येत आहे.
हरियाणात भाजप सध्या ४८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे.