---Advertisement---
जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवारी (२२ जुलै) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपा जिल्हा महानगरतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा महानगरतर्फे शहरातील पाच मंडलांमध्ये महारक्तदान शिबिर घेतले जाणार आहे. मंगळवारी २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत महानगरातील पाच मंडलात रक्तदान शिबिर घेण्यात येतील.
यात मंडल क्रमांक १ छत्रपती शिवाजी महाराज मंडल रक्तदान शिबिराचे ठिकाण ‘वसंत स्मृती’, भारतीय जनता पार्टी कार्यालय, मंडल क्रमांक २ संत झुलेलाल बहिणाबाई मंडल रक्तदान शिबिराचे ठिकाण भारतीय जनता पार्टी कार्यालय, जी. एम. फाउंडेशन, मंडल क्रमांक ३ सरदार वल्लभभाई पटेल मंडल रक्तदान शिबिराचे ठिकाण- स्व.म ीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स, सेंट जोसेफ शाळेसमोर, भूषण कॉलनी, मंडल क्रमांक ४ प्रभू श्रीराम अयोध्या मंडल मनुमाता मंदिर, अयोध्या नगर, महादेव मंदिर चौक, मेहरूण मंडल क्रमांक ५ म हाराणा प्रताप मंडल रक्तदान शिबिराचे ठिकाण रेडक्रॉस सोसायटी, पिंप्राळा याठिकाणी शिबिर होणार असल्याचे जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी कळविले आहे.