महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

जळगाव : महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त जय आनंदगृप तर्फे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 300 बॅग रक्तसंकलन करण्यात आले. हा कार्यक्रम खान्देश सेंट्रल मॉल येथे घेण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर प्रदीप रायसोनी, माजी नगरसेवक अमर जैन, अध्यक्ष नरेद्र सांडेचा, नरेद्र बंब, सचिन बाफना, संजय भंसाली, आनंद मुणोत, नितीन कांकरीया, चेतन देसर्डा, अजित कोठारी, अनिल सिसोदिया, परितोष बोथरा, विशाल चोरडीया   कपील बोरा, पंकज जैन आदी सभासद उपस्थित होते.