---Advertisement---

ब्लू घोस्ट लँडरने चंद्रावरून टिपले सूर्योदयाचे नयनरम्य दृश्य ; पहा व्हिडिओ

by team
---Advertisement---

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका खाजगी अंतराळ कंपनीचे ‘ब्ल्यू घोस्ट’ हे यान २ मार्चला चंद्रावर यशस्वीपणे उतरले आणि आता त्याने चंद्रावरील सूर्योदयासह अनेक नेत्रदीपक छायाचित्रे टिपली आहेत. ही मोहीम ‘नासा’ आणि व्यावसायिक अंतराळ संशोधन संस्था ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ यांच्या सहकार्याने राबवली जात आहे. यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी नव्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे, हे उद्दिष्ट आहे.

ब्ल्यू घोस्ट हे चंद्रावर उतरलेले दुसरे खाचगी लँडर आहे. याआधी फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘इंट्यूटिव्ह मशिन्स’च्या ‘ओडिसियस’ लँडरने चंद्रावर यशस्वी लैंडिंग केले होते.

ब्ल्यू घोस्ट मिशन १ ज्याला ‘घोस्ट रायडर्स इन द स्काय’ असे नाव देण्यात आले आहे. ही फायरफ्लाय एअरोस्पेसची २०२८ पर्यंत नियोजित तीन चंद्र मोहिमांपैकी पहिली आहे. १५ जानेवारीला नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून ब्ल्यू घोस्टने यशस्वी प्रक्षेपण केले होते. ब्ल्यू घोस्टने आपले लँडिंग ‘मारे क्रिसियम’ या चंद्राच्या निअर-साईडवरील म्हणजेच पृथ्वीच्या दिशेने असलेल्या भागात ३०० मैल रुंद खोऱ्यात केले. लैंडिंगनंतर लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावरून घेतलेल्या छायाचित्रांचे संकलन केले, जे आगामी अंतराळ संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment