Bodwad: बोदवड विधीसेवा प्राधिकरण व बोदवड न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानाने बोदवड येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात’ जागतिक आरोग्यदिनाच्या कार्यक्रम व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ॲड. अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ यांनी संबोधन केले की,आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्यासाठी दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. तुमचे शरीर हीच तुमची सपंत्ती आहे.
यावर पुढे बोलतान त्यांनी “आरोग्य म्हणजेच धन”. या म्हणीचा अर्थ आहे की, जर तुमचे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकता. शरीर आणि मन यांचं आरोग्य एकमेकांशी निगडित असतं ,आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी,पैसा अडका व संपत्ती असणे म्हणजे श्रीमंती नव्हे तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधिश क्यु.यु.एन शरवरी हे होते. बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, ,सचिव ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड.के.एस इंगळे, ॲड. किशोर महाजन, सरकारी वकील ॲड.डी. बी. वळवी , ॲड. मीनल अग्रवाल प.स.विस्तार अधिकारी योगराज लोहार , डॉ.ए.एन.काजळे यांनी चांगल्या आरोग्यासाठी ची नियमावली सांगितली , डायनामिक फिटनेस क्लब च्या संचालिका सौ.चेतना तायडे यांनी अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोदवड तालुका वकीलसंघ व न्यालयीन कर्मचारी अधिक्षक वैभव तरटे,विधी प्राधिकरण समन्वयक अविनाश राठोड,एस.एस.भट , रेखा इंगळे, , राहुल साबळे , समाधान बेलदार यांनी परीश्रम घेतले. सदर कार्यक्रमास वकील बांधव व पक्षकार , आरोग्य सेविका मोठ्या संख्येने हे उपस्थित होते.
Bodwad News : बोदवड न्यायालयात जागतिक आरोग्य दिन उत्साहात संपन्न
