दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात बॉयलरचा स्फोट

---Advertisement---

 

भुसावळ येथील दिपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ६६० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पात बॉयलर ट्यूबचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोटाचा मोठा आवाज होताच कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.

या घटनेनंतर काही काळ प्रकल्प परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार स्फोटात कुणालाही दुखापत झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बॉयलर ट्यूबचा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रकल्पाचे तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तात्काळ तपासणी सुरू आहे. अधिकृत कारण समोर आल्यानंतरच पुढील माहिती स्पष्ट होईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---