---Advertisement---
ED: बॉलीवूडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री सनी लियोनी यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रेटी ईडीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महादेव ऑनलाईन बेटिंग अॅपच्या संदर्भात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमध्ये त्यामध्ये बॉलीवूडमधील विशाल ददलानी, कृष्णा अभिषेक सह आणखी काही सेलिब्रेटींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.महादेव ऑनलाईन बेटींग अॅपच्या संदर्भात ईडीनं छापेमारी करण्यात आली आहे. अशी माहिती साम टीव्ही वृत्तवाहिनीनं दिली आहे.या कारवाईमध्ये बॉलीवूडचे मोठमोठे कलाकार जाळ्यात अडकल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
राज्यात आतापर्यत ईडीनं सर्वात मोठी कारवाई केली आहे. ३९ ठिकाणी छापेमारी केली आहे. ही कारवाई महादेव ऑनलाईन बेटींग अॅपशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. यात एकुण ४१७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.मनी लॉड्रिंग प्रकरणातील ही आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, कोटयवधी रुपयांच्या रोख देवाण-घेवाणीची चौकशी होणार आहे. यात नुसरत भरुचाचेही नाव घेतले जात आहे. विदेशातील एका मोठ्या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. त्यांना एका प्रायव्हेट प्लेनमधून त्या लग्नासाठी नेण्यात आले होते. अशीही माहिती समोर आली आहे.
---Advertisement---