काबुलमध्ये बॉम्बस्फोट, दहा जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाल्याची बातमी समोर येतंय. स्फोटाच्या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून ८ लोक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. हा हल्ला अफगाणिस्तान सैन्य दलाच्या हवाई तळावर झाल्याचे कळते.

मंत्रालय प्रवक्ते अब्दुल नाफी टाकोर यांनी सांगितलं की, जिथं हा हल्ला झाला तिथं काबुलचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असून या स्फोटाचं कारण समजलेलं नाही.

टाकोर यांनी सांगितल्यानुसार, या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तपास अधिकारी या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. काबुलमधील या हल्ल्याने देशामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

काबुलवर आज झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपच्या सदस्यांनी घेतली आहे. मागच्या महिन्यात काबुलमधील एका हॉटेलवर हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये ५ चिनी नागरीक जखमी झाले होते. ज्या हॉटेलमध्ये हल्ला ते चिनी लोक थांबण्याचा ठिकाण होतं.