मुंबईहून न्यू यॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर विमान परत मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले. विमानात ३२० हून अधिक लोक होते आणि ते मुंबईत सुरक्षितपणे उतरले.
आज सोमवारी (दि. १० मार्च) मुंबई-न्यू यॉर्क या विमानात उड्डाणादरम्यान संभाव्य सुरक्षा धोका आढळून आला. आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर, सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या हितासाठी, विमान मुंबईला परतले. स्थानिक वेळेनुसार १०.२५ वाजता विमान सुरक्षितपणे मुंबईत परतले.
‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात बॉम्बची धमकी देण्यात आली होती. विमानाच्या एका स्वच्छतागृहात एक चिठ्ठी सापडली. यानंतर विमान हवेतूनच मुंबई विमानतळाकडे परतले. दयेथे सुरक्षा रक्षकाकडून विमानाची तपासणी केली जात आहे. विमानातील प्रवाशांना पुन्हा उड्डाणाचे वेळापत्रक निश्चित होईपर्यंत तेथेच थांबवले जाणार आहे.
मुंबईहून न्यू यॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला विमानात संभाव्य सुरक्षेचा धोका आढळून आल्यानंतर विमानाला पुन्हा माघारी परतावे लागले. एअर इंडियाच्या AI119 या नावाचे विमान सोमवार १० मार्च २०२५ रोजी सकाळी १०.२५ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. मुंबईतील विमानतळावर सुरक्षा रक्षकांकडून विमानाची तपासणी केली जात आहे.
यापूर्वी, एअर इंडियाच्या शिकागो-दिल्ली हवाई विमानाला तांत्रिक बिघाडामुळे शिकागोला परतावे लागले. एअर इंडियाचे विमान गुरुवारी अमेरिकेतील शिकागोहून दिल्लीला उड्डाण केले, परंतु सुमारे १० तासांनंतर विमानाला शिकागोला परतावे लागले.
.