---Advertisement---
ब्राह्मण ब्रीझ नेटवर्क असोसिएट्स (बीबीएनए) धुळे चॅप्टर तर्फे नवीन आर्थिक वर्ष शुभारंभ निमित्ताने उद्योजक व व्यवस्थापकीयांच्या औपचारिक बैठकीचे आयोजन नुकतेच हॉटेल गणपती पॅलेस सभागृहात करण्यात आले होते. नवीन मराठी व आर्थिक वर्षाच्या निमित्ताने परस्परांच्या भेटीतून सुसंवाद स्थापित व्हावा या हेतूने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ उद्योजक श्री रवीजी हलसगीकर, सोलापूर हे लाभले होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रथितयश मानसोपचार तज्ञ डॉ तुषार भट हे उपस्थित होते. जेष्ठ उद्योजिका सौ वीणा ताई गानू, जेष्ठ सनदी लेखापाल सीए राजाराम कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच जेष्ठ विचारवंत व वक्ते मा सीए प्रकाश पाठक, जेष्ठ सनदी लेखापाल सीए श्रीराम देशपांडे, श्री संजय सर सोलापूर, बीबीएनए पदाधिकारी स्वप्निल जोशी, सागर देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी सुपरिचित उद्योजकश्री आप्पासाहेब हेमंत कुलकर्णी यांचा त्यांच्या व्यावसायिक कामगिरी बद्दल सन्मान करण्यात आला. तसेच या बैठकीत सुपरिचित उद्योजक व अभियंता राहुल कुलकर्णी यांच्या इसेंशियल इक्विपमेंट्स उद्योगाचे व स्वप्नील जोशी यांच्या आर के लॉजिस्टीक्स् या उद्योगांचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. व त्यांचा व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रमुख अतिथीं कडून सन्मान करण्यात आला. प्रमुख वक्ते मा रविजी हलसगीकर सोलापूर यांनी व्यावसायीकांचे संघटन वाढवणे , सोशल मिडिया द्वारे संपर्कात रहाणे, तसेच मासिक बैठकांचे आयोजन, व्यवसाय वृध्दींगत होण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले व उद्योजकांमधील सुसंवादावर भर दिला.
प्रमुख अतिथींचे डॉ तुषार भट यांनी उद्योजक व व्यावसायिकांनी एकमेकांना सहकार्य करत व संघटन वाढवून व्यवसाय वृध्दी करण्याचे आवाहन केले. प्रा पंकज अडावदकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात व्यावसायिक बैठकीचा समारोप झाला.









