Breaking Maharashtra Congress Political: लोकसभा निवडणुकीपूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला जय महाराष्ट्र

Maharashtra Congress Political : लोकसभा निवडणुकांआधीच काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्याच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत याबाबातची माहिती दिली आहे. बाबा सिद्दीकी येत्या १० तारखेला अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.

मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.

पोस्टमध्ये काय म्हणालेत बाबा सिद्दीकी?

“मी तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो आणि हा माझा 48 वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला खूप काही बोलायचे आहे. पण, ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या…या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असं बाबा सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जातात. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. . 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.