Breaking : विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणुक जाहीर, विधान परिषद, पदवीधर मतदार संघ, शिक्षक मतदार संघ

राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक जाहीर झाली आहे. विधान परिषदेतील चार आमदारांचा कार्यकाळ  ७ जुलै रोजी संपत असून  १० जूनला मतदान होणार आहे. यात मुंबई, नाशिक आणि कोकण विभागाचा समावेश आहे.

विधान परिषदेमधील एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात.  निवडणूक आयोगाने दोन पदवीधर आणि  दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार १० जूनला मतदान होणार असून  १३ जूनला मतमोजणी होईल.

विधान परिषदेची या चार जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया १५  मे पासून सुरू होईल . इच्छुक उमेदवारांना २२  मेपर्यंत अर्ज दाखल करता येईल. इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी २४ मे रोजी होईल.  २७ मेपर्यंत उमेदवारांना अर्ज मगे घेता येणार आहे.

या चार आमदारांचा कार्यकाळ आला संपुष्टात 

मुंबई पदवीधर – विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर निरंजन वसंत देवखरे, नाशिक शिक्षक किशोर भिकाजी दराडे व मुंबई शिक्षक कपिल हरिश्चंद्र पाटील यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे.  पदवीधर मतदार संघातील उमदेवाराला नोंदणी आवश्यक असते. मतदार संघात हजर राहून मतदान करावे लागते.. निवडणूक जाहीर होण्याच्या तीन वर्षाआधी मतदाराने आपला पदवी अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा.