Breking News: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला!

पुणे : शुक्रवारी रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी ती १० मे ला पूर्ण झाली असून, आज या प्रकरणाचा निकाल लागला. या निकालानुसार वीरेंद्र तावडेला निर्दोष मुक्त करण्यात आले तर सचिन प्रकाशराव अंदूरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना जनमठेप आणि पाच लाख दंडांची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच तावडे, विक्रम भावे आणि पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

न्यायालय म्हणाले की, कोणाचाही खून होणे ही दुर्देवी घटना आहे. साक्षीदाराची उलट तपासणी घेताना आरोपीच्या वकिलांकडून खुनाचा समर्थन करण्याची वक्तव्य करण्यात आली ती दुर्देवी आहेत. त्यावर त्यांनी विचार करावा असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आली. या घटनेने अवघे राज्य हादरले. दाभोलकरांच्या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी हा खुनाचा खटला सुरू झाला. खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली.

जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू होता. २ साक्षीदार न्यायालयात उभे केले. आता या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले असून, आज दाभोलकर खटल्याचा निकाल लागला. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.