किल्ले शिवनेरी : उदया म्हणजे १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्त, तसेच पर्यटक गर्दी करत आहेत. अशातच किल्ले शिवनेरीवर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे
सालाबादप्रमाणे उद्याही शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात पार पडणार आहे. या निमित्ताने शिवजयंती सोहळ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अकराशे पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात असणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे . पण आशयातच किल्यावर एक अनुचित प्रकार घडल्याची माहिती आली आहे.
या सोहळ्यासाठी, पर्यटक, राज्यातील शिवभक्त शिवनेरीवर गर्दी करताना दिसत आहेत. पर्यटकांना पाहून काही हुल्लडबाज तरुणांनी मधमाश्यांच्या मोहोळावर दगड फेक केली. ज्यानंतर मधमाश्यांनी हल्ला चढवल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामध्ये चिमुकल्यासह ४ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जखमींवर सध्या जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पर्यटकांना पाहून काही हुल्लडबाज तरुणांनी मधमाश्यांच्या मोहोळावर दगड फेक केली. ज्यानंतर मधमाश्यांनी हल्ला चढवल्याचे सांगण्यात येत आहे.