Electoral Bonds : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने इलेक्टोरल बाँड्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. यापूर्वी दिलेल्या निकालात SBI 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाकडे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते.
निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला मुदतवाढ मिळणार का? याचा फैसला आज होणार होता. SBI ने 30 जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडे याबाबत मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने SBIला दणका देत उद्याच कामकाज संपण्यापूर्वी माहिती देण्यास सांगितली आहे. निवडणूक आयोगालाही ही माहिती जारी करण्यास 15 मार्चपर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे.