जम्मू आणि काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून त्यांना मारलं जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर, लष्कर १४ खतरनाक दहशतवाद्यांची यादी घेऊन मैदानात उतरले आहे आणि यापैकी आतापर्यंत ६ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. राज्यात सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवायांवर शुक्रवारी लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त पोलिस परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेत पोलिस आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादाचे उच्चाटन करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.
‘४८ तासांत आम्ही दोन यशस्वी ऑपरेशन्स केले’
दोन्ही कारवायांबद्दल माहिती देताना, काश्मीरचे आयजीपी व्ही.के. बर्दी म्हणाले ‘काश्मीर खोऱ्यातील वाढत्या दहशतवादी कारवाया लक्षात घेता, येथे तैनात असलेल्या सर्व सुरक्षा दलांनी त्यांच्या रणनीतींचा आढावा घेतला. या नंतर, ऑपरेशन्सवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आल. गेल्या ४८ तासांत, आम्ही दोन अतिशय यशस्वी ऑपरेशन्स केले आहेत. हे २ ऑपरेशन केरन आणि त्राल भागात करण्यात आले, ज्यामुळे एकूण ६ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यावेळी, तिथे उपस्थित असलेल्या लष्करी अधिकाऱ्याने दोन्ही ऑपरेशन्स सविस्तरपणे समजावून सांगितले.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये शाहिद कुट्टेचाही समावेश
व्ही.के. बर्दी म्हणाले की, येथील दहशतवादी परिसंस्था नष्ट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. १३ मे रोजी शोपियानमध्ये ३ लष्कर दहशतवादी मारले गेले होते, तर गुरुवारी त्रालमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ३ दहशतवादी मारले गेले होते. या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे आणि ८ दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू आहे. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि द रेझिस्टन्स फ्रंटशी संबंधित या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. शोपियानमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये शाहिद कुट्टेचाही समावेश होता, जो लष्करचा टॉप कमांडर होता.