ना हरकत प्रमाणपत्रासाठी १५ हजारांची लाच, सार्वजनिक बांधकामच्या आरेखकावर धुळे लाचलुचपतची कारवाई

---Advertisement---

 

जळगाव : पेट्रोल पंपाच्या जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, यासाठी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आरेखकाने १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यास सोमवारी लाच स्वीकारताना पकडले. वासुदेव धोंडू पाथरवट असे या आरेखकाचे नाव आहे.

तक्रारदाराची वाकडी, ता. जामनेर येथे गट क्रमांक १३९/१/पैकी अ क्षेत्र २७ आर शेतजमीन आहे. या शेतजमिनीत इंडियन ऑईल कंपनी, छत्रपती संभाजीनगर यांनी अलॉटमेंट लेटर देवून पेट्रोलपंपासाठी करारनामा केला आहे. त्यानुसार १ हजार २२५ चौरस मीटर
क्षेत्रात नियोजीत पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाकडून ना हरकत मिळावी यासाठी कंपनीने पत्र दिले होते.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडे पेट्रोल पंपाच्या नाहरकती संदर्भात पत्राद्वारे अभिप्राय मागविला होता. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात अर्ज दाखल केला होता. तक्रारदार व त्यांचा मित्र हे नियोजीत पेट्रोल पंपासाठी नाहरकत प्रमाणपत्र लवकरात लवकर बांधकाम मिळावे यासाठी सार्व. विभाग आरेखक वासुदेव पाथरवट यांच्याकडे वेळोवेळी फेऱ्या मारल्या. दरम्यान, ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सुरुवातीला दोन हजार व काम झाल्यावर १५ हजारांची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

संबंधित तक्रारदाराच्या मित्राकडे २१ नोव्हेंबर रोजी आरेखक पाथरवट याने लाचेची मागणी केली. याची पडताळणी केल्यानंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक पद्मावती कलाल यांनी सापळा लावून २४ रोजी तक्रादाराकडून १५ हजारांची लाच स्वीकारताच पकडण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---