जिल्हा प्रशासनात लाचखोरी प्रवृत्ती वाढली, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच दोन कर्मचाऱ्यांना एसीबीने रंगेहात पडकले

---Advertisement---

 

जळगाव : २०२४ च्या तुलनेत २०२५ या वर्षात जळगाव जिल्हा प्रशासनात लाचखोरी प्रवृत्तीत वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात आले. प्रशासनात प्रकरण मार्गी लावण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम सर्रासपणे मागणी केली जात असल्याचे या घटनांमधुन समोर आले आहे.

पहिली कारवाई जामनेरला

तक्रारदार हे जामनेर येथील रहिवासी आहेत. त्यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी मौजे जामनेर येथील बिनशेती दोन प्लॉट कायम खरेदी केले आहेत. यानंतर तक्रारदार व त्यांची पत्नीचे फेरफार नोंद करुन त्यांचे नाव अधिकार अभिलेखात तसेच सातबारा उताऱ्यावर दाखल करण्याची कार्यवाही करणे आवश्यक होते. याकामाच्या मोबदल्यात तलाठ्याने सुरुवातील पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार लाचेची रक्कम देण्याचे निश्चित झाले. याप्रकरणी तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानुसार बुधवारी (७ जानेवारी) जळगाव एसीबीने सापळा लावला असता तलाठी वसीम राजु तडवी याना तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नवीन वर्षात लाचप्रकरणी जळगाव जिल्ह्यात हा पहिला गुन्हा नोंदविण्यात आला.

ही कारवाई एसीबीचे उपअधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सापळा पथकातील पोलीस नाईक बाळु मराठे, कॉन्सटेबल भुषण पाटील यांनी केली.

नदुरबार एसीबीचा पारोळ्यात ट्रॅप

तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी यांच्या मालकीचे शेत आहे. या शेतात मागेल त्याला सौर कृषी पंपासाठी सर्वेक्षणाचे काम करुन देणे आवश्यक होते. हे सर्वेक्षण करुन देण्याच्या मोबदल्यात महावितरणाच्या पारोळा मंगरुळ कक्षातील वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक हजार रुपयांची मागणी केली. शुक्रवारी (८ जानेवारी) सायंकाळी पाच ते पावणे सहा वाजेच्या सुमारास चोरवड गावातील एका चहाच्या दुकानात तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपयांची लाचेची मागणी स्विकारताना नदुरबार एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात लाचखोरी प्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला. सलग दोन दिवस प्रशासनातील लाचखोरी चव्हाट्यावर आल्याचे या घटनांमधुन समोर आले.

आकडे बोलतात

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सन २०२५ या वर्षी भ्रष्ट्राचाराविरोधात प्रभावीरित्या ४५ सापळा रचत हिसका दाखविला. या कारवाईतून ७८ संशयितांवर भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियमान्वये पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. सन २०२४ वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याचे यातून समोर आले. या कारवाईत एसीबीने ताब्यात घेत अटक केलेल्या एकूण संशयित आरोपींमध्ये वर्ग एकचे तीन संशयित, वर्ग दोनचे सहा संशयित, वर्ग तीनचे ३५ तसेच वर्ग चारचे चार जण इतर लोकसेवक १३ यांना गजाआड केले. याशिवाय१७ खाजगी व्यक्तींचा गुन्हा दाखल केलेत्यांमध्ये समावेश आहे.

तक्रारीसाठी टोल फ्री नंबर

कार्यालयीन वेळेनंतर वा सुटीचे दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यप्रणालीबद्दल अथवा तक्रार करण्यासंदर्भात माहिती हवी असल्यास एसीबीचा टोल फ्री नंबर १०६४ ची सेवा सुरू करण्यात आली आहे.

या विभागात लाचखोरी

२०२५ या वर्षी एसबीने केलेल्या कारवाईत महसूल विभागात सात सापळा कारवाईतून १३ जणांवर गुन्हा दाखल केला. जिल्हा परिषदेत पाच सापळे लावत सहा जणांवर गुन्हा, पोलीस दलात पाच सापळे लावुन नऊ जण, महावितरणमध्ये पाच सापळात पाच जण, वन विभागात तीन सापळ्यात नऊ संशयितांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. सरपंच पदाशी संबंधित तीन सापळ्यात नऊ तर शिक्षण विभागात चार सापळा लावुन सात जणांवर गुन्हा दाखल केला. मनपात दोन संशयित, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दोन संशयित, राज्य परिवहन महामंडळ, भूमी अभिलेख, सार्वजनिक आरोग्य विभाग, महावितरण कंपनी, राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रत्येकी एक अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला. मनपात दोन सापळ्यात चार संशयित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य खाजगी इसमांवरही कारवाई करत ७७ जणांवर गुन्हे दाखल केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---