---Advertisement---

लाचखोर पोलीस कर्मचारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

by team

---Advertisement---

नंदुरबार : मुख्याध्यापकावर एक दिवसांपूर्वीच एसीबीची कारवाई झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका पोलीस कर्मचाऱ्याने गुन्हा दाखल न करण्यासाठी आठ हजारांची लाच स्वीकारली. लाचखोर पोलिस कर्मचाऱ्याला नंदुरबार एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे, यामुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दारासिंग जोरदार पावरा (35) असे अटकेतील पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

नवापूर तालुक्यातील कुंकरान येथील तक्रारदार  असून त्यांचे अन्य संशयीतांशी झालेल्या वादानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी 10 हजारांची लाच विसरवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी दारासिंग पावरा यांनी बुधवारी मागितली होती. मात्र, आठ हजार रुपयांमध्ये तडजोड झाली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नंदुरबार एसीबीकडे याबाबत तक्रार केल्यानंतर लाचेची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा लाच स्वीकारताच पावरा यांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.  

नंदुरबार एसीबीचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवी एस.वाघ, हवालदार विलास पाटील, हवालदार ज्योती पाटील, नाईक मनोज अहिरे, अमोल मराठे आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---