---Advertisement---
चाकण एमआयडीसी परिसरात 20 जानेवारी रोजी स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजयसिंह याचा चुलत भाऊ संग्रामसिंगनेच अजयच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासातून पुढे आलं आहे.
संग्रामसिंग याने 12 लाख रुपयांत भावाला ठार मारण्याची सुपारी आरोपींना दिली होती . याप्रकरणी, पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून नुकतेच एकास उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले.
काय होती घटना, कसा झाला पर्दाफाश ?
चाकण एमआयडीसी परिसरात 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजित सिंग हे कंपनीत उभे होते. प्रवेशद्वारावर आलेल्या दुचाकीवरून दोघांपैकी एकाने त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला.या हल्ल्यात त्यांच्या पाठीत आणि पोटात या दोन गोळ्या घुसल्या होत्या.
पोलिसांच्या तपासात चुलत भावानेच सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. कौटुंबिक वाद आणि व्यावसायिक स्पर्धेतूनच हा कट रचल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा :कर्जाच्या हप्त्याने जुळले सूत ! नवऱ्याला सोडून विवाहितेने थाटला बँक कर्मचाऱ्यासोबत संसार
संग्रामसिंग असे या कटाचा सूत्रधार असलेल्या चुलत भावाचे नाव असून, त्याने आपल्या भाऊ अजय सिंगच्या हत्येसाठी चौघांना सुपारी दिली होती. अजय सिंग हा कैलास स्टील कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहे. या हत्येच्या कटाअंतर्गत कंपनीच्या प्रवेशद्वारावर अजयवर गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने तो बचावला, मात्र या घटनेनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या.
गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी रोहित पांडे याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली, त्यानंतर चौकशीत संग्रामसिंगच्या कटाची माहिती समोर आली. अजय आधी संग्रामकडे कामाला होता आणि त्याच्याच मदतीने स्टील उद्योगात पाऊल टाकलं होतं. मात्र, अजय स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू लागल्याने संग्रामला हे सहन झालं नाही. या व्यावसायिक स्पर्धेतूनच त्याने अजयची सुपारी दिली आणि गोळीबाराचा कट रचला.
हेही वाचा : Nanded Crime : गुरु-शिष्य परंपरेला काळीमा ! गुंगीचे औषध देत अत्याचार, विद्यार्थिनी गर्भवती
विशेष म्हणजे, संग्रामसिंगने हा प्रकार लपवण्यासाठी चुलत भावाच्या नात्याचा पुरेपूर फायदा घेतला. जखमी अजयला हॉस्पिटलमध्ये भेट देऊन सहानुभूतीही व्यक्त केली आणि पोलिसांच्या तपासावर नजर ठेवत होता. मात्र, अखेर पोलिसांनी काटेकोर तपास करत तोच सुत्रधार असल्याचा पर्दाफाश केला.
ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर अजय सिंगला मोठा मानसिक धक्का बसला आहे. “मी ज्याला आदर्श मानत होतो, तोच माझ्या जीवावर उठला,” असे अजयने सांगितले.
पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील उर्वरित आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.









