पुण्यातील स्वारगेट बसस्थानकाजवळ शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय महिलेवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. या नराधमाने एकदा नव्हे तर दोनदा पीडितेवर अत्याचार केला. या घटनेमुळे पुणेच नव्हे तर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आरोपी फरार असून पोलिसांच 13 पथकं त्याचा शोध घेत आहेत. आरोपीला फरार घोषित करण्यात आलं असून पकडून देणाऱ्यांना 1 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवशाही बसमधील अत्याचाराची घटना उघडकीस आली होती, आणि आता आणखी एका धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे एका चुलत दिरानेच वहिनीच्या अंघोळीचे चोरून व्हिडीओ शूट केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
हेही वाचा : अनैतिक संबंध : नवऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं अन् प्रियकरालाही गमावून बसली महिला, नेमकं काय घडलं?
ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. संबंधित महिला स्नानगृहात अंघोळ करत असताना, तिच्या चुलत दिराने बाथरूमच्या मागील खिडकीतून मोबाईल कॅमेरा लावून तिचे चोरून शूटिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वहिनीच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तिने तत्काळ आरडाओरडा केला.
महिलेने धाडसाने हा प्रकार उघडकीस आणला आणि कुटुंबीयांना माहिती दिली. ही संतापजनक बाब समोर आल्यानंतर गावातील लोकांनी तातडीने आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी चाकण पोलिसांनी आरोपी चुलत दिराला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.