---Advertisement---
जळगाव : ”मी येणार नाही, घरी लक्ष ठेव!” असे बहिणीला फोनद्वारे कळवून हिरालाल नारायण चौधरी (५२, रा. विठ्ठलपेठ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कंपनीमध्ये कामाला असलेले हिलाराल चौधरी हे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह विठ्ठलपेठेत राहत होते. ते १४ मेपासून घरून निघून गेलेले होते. १५ मे रोजी त्यांनी त्यांच्या बहिणीशी संपर्क साधून ‘मी येणार नाही, घरी लक्ष ठेव!’ असे कळविले होते.
---Advertisement---
त्यानंतर १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारातील एका शेतात ते गळफास घेतलेल्या अवस्थेत एका जणाला दिसले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
जळगाव : भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे सोनू बारेला (मूळ रा. शिरवेल महादेव, जि. खरगोन, ह.मु, कुसुंबा शिवार) हे ठार झाले. हा अपघात १५ मे रोजी झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील सोनू बारेला हे कुसुंबा शिवारातील एका शेतामध्ये राहत होते. १५ मे रोजी ते रस्त्याने जात असताना गो शाळेसमोर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात ते ठार झाले. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला.
विहिरीतील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू
जळगाव : विहिरीमध्ये पाण्यात बुडून नयन सुभाष गुजर (२२, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) यांचा मृत्यू झाला. पाण्यात बुडाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.